Friday, February 28, 2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा 2025

दूधसाखर महाविद्यालयात संपन्न झालेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थीनीला पारितोषिक देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील सोबत ग्रंथपाल अतुल नगरकर

दूधसाखर मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा समारोप .      बिद्री. येथील दूधसाखर महाविद्यालयामध्ये मराठी,हिंदी,इंग्रजी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा 2025 या उपक्रमाची सांगता झाली. या उपक्रमांतर्गत  ग्रंथालयातील उपविभागांची स्वच्छता,  ग्रंथ प्रदर्शन, सर्वांसाठी मुक्त वाचन, दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन, परिसंवाद, लेखक व विद्यार्थी वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, सामूहिक वाचन ,कथन, ग्रंथ परीक्षण असे विविध कार्यक्रम पार पडले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी या उपक्रमाचा विद्यार्थांना व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना खूप फायदा झाला.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन  प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते झाले .
प्रा. डॉ. एस. ए. साळोखे यांनी वाचन कौशल्य कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. तसेच  पुस्तकाचे सामूहिक वाचन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.  
स्थानिक लेखक परिसंवाद व नव साहित्याची ओळख या विषयावर नवलेखक प्राध्यापक डॉ. शिवाजी देसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 
लेखक विद्यार्थी वाचन संवाद उपक्रमांतर्गत स्थानिक नवलेखक श्री. विजय पाटील यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.
पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग नोंदविला कथन स्पर्धेमध्ये कथाकथन कसे करावे याविषयी प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिरासदारांच्या व्यंकुची शिकवणी या कथेचे  कथन करून दाखविले. 
26 जानेवारी 2025 रोजी विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. 
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल अतुल नगरकर यांनी तर आभार प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी मानले.सूत्रसंचालन  प्रा.सुहानी पाटील यांनी व प्रा.संपदा वारके यांनी केले. प्रा.डॉ.वैशाली कांबळे,नॅक समन्वयक डॉ.एस.जी.खानापुरे,  जगन्नाथ कांबळे,संग्राम भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

For M.Sc. computer LIC Committee came!

Sunday, January 23, 2022

Notice

नोटीस । 
मराठी विभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त         सुंदर              हस्ताक्षर स्पर्धा मंगळवार दि.25 । 1 । 2022 रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयात रूम नंबर 7 मध्ये आयोजित केल्या आहेत.  सदर दिवशी वेळेवर उपस्थित रहावे. तरी इछुक विध्यार्थी। विद्यार्थिनींनी आपली नावे डॉ.एस.डी.पाटील यांचेकडे 9561108248 या नंबरवर सोमवार दि.24।1।2022 पर्यंत नोंदवावीत प्र.प्राचार्य